मावळ तालुक्यातील कामशेत पोलिस ठाण्यात दाखल एका फिर्यादीचा तपास पूर्ण करताना कामशेत पोलिसांनी, महिलेद्वारे संपर्क करुन भेटायला बोलावून लोकांना मारहाण करत लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कामशेत पोलिसांनी दाखल फिर्यादीवर तत्काळ एक्शन घेत अवघ्या 12 तासात ही कामगिरी केली आहे. ( Kamshet Police Busted Gang Who Beating And Robbing Citizens By Contacting Through Women )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 01 मार्च 2023 रोजी रात्री 11 वाजता महिला आरोपीने फिर्यादी आदेश दत्ता दहीभाते (वय 24 वर्षे, रा. बेडसे ता. मावळ जि. पुणे) याचा मित्र सुरज चौधरी याच्या मोबाईल फोनवर फोन करुन फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना शिवशंकर मंगलकार्यालयाजवळ भेटण्यासाठी बोलावले होते.
फिर्यादी आणि त्याचे चार मित्र हे त्या महिलेला भेटण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी पुर्वीपासुन दबा धरुन बसलेल्या 1) सतिष बिडलाम, 2) रुपेश लालगुडे, 3) प्रतिक निळकंठ 4) रोहीत उर्फ बाबु चोपडे आणि त्यांचे इतर तीन ते चार साथीदार यांनी फिर्यादी व त्यांचे साथीदार यांना शिवशंकर मंगलकार्यालयाचे पाठीमागील बाजुला नेऊन चामडी पट्टा, लाकडी दांडके व लोंखडी रॉडने बेदम मारहाण केली.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना पिस्टलचा धाक दाखवून तुमच्याविरुध्द खोटी बलात्काराची केस करतो, अशी भीती घालून त्यांना चारचाकी गाडीत बसवुन त्यांचे अपहरण करुन त्यांना कुसगांव येथील एका डोंगरात नेऊन तिथे त्यांचे कपडे काढून त्यांचे नग्न फोटो काढले आणु आरोपींनी फिर्यादीस दोन लाख रुपये द्या नाहीतर तुमचे फोटो व्हायरल करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना पुन्हा गाडीत बसवुन तसेच फिर्यादीची स्विप्ट कार ताब्यात घेऊन त्यांना पैशाची मागणी करुन अपहरण करुन त्याना लोणावळा कुसगांव, वडगांव, तळेगांव येथे नेऊन मारहाण केली.
सदर प्रकाराबाबत माहिती मिळताच अपहरण झालेल्या फिर्यादी आणि त्यांचे मित्र यांची सुटका करण्याकरिता रात्रीच तत्काळ पोलिस निरिक्षक जगताप आणि पथक यांनी इतर पोलीस स्टेशनचे रात्रगस्तीचे वाहनांना सतर्क करुन नाकाबंदी केली. तेव्हा पोलिसांचा पाठलाग सुरु असल्याची चाहुल लागताच आरोपींनी फिर्यादीच्या मित्रांकडून ऑनलाईन 20 हजार रुपये घेऊन अपहरण केलेल्या फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना तळेगांव दाभाडे येथे पहाटे सोडून तेथून वाहनासह पळ काढला.
त्यानंतर आरोपी यांनी फिर्यादी आणि त्यांचे मित्रांना बेदम मारहाण करुन त्यांचेकडुन 20 हजार रुपये घेवून त्यांना तळेगांव येथे रस्त्यावर सोडुन दिले होते. त्याबाबत कामशेत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 60/2023 भादवि कलम 364 (ए), 326, 324, 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149, आर्म एक्ट 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – मुस्लीम धर्मगुरुच्या पत्नीचा विनयभंग, देहूरोड येथील धक्कादायक घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल
गुन्ह्यातील आरोपी हे शिर्डी येथे असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलिस निरिक्षक संजय जगताप यांनी पोलीस स्टेशनकडील सपोनि पवार आणि पथक यांना आरोपींचा शोध घेण्याकरिता शिर्डी येथे रवाना केले. त्या तपास पथकाने शिर्डी येथे जावुन आरोपी 1) प्रतिक उर्फ लाया अर्जुन निळकंठ (वय 24 वर्षे रा. छावा चौक कामशेत ता. मावळ जि. पुणे) 2) रुपेश उर्फ कवठया विजय लालगुडे (वय 24 वर्षे रा. कुसगांव खुर्द ता. मावळ जि. पुणे) 3) सतीश कृष्णकुमार बिडलाम (वय 28 वर्षे रा. कामशेत ता. मावळ जि. पुणे) 4) रोहीत गणेश चोपडे (वय 27 वर्षे रा. कामशेत ता. मावळ जि. पुणे) 5) साहील महादेव भिसे (वय 20 वर्षे रा. चिंचवड पुणे) ६) महिला आरोपी (वय 20 वर्षे रा. वडगांव मावळ) यांच्या मुसक्या आवळुन त्यांना ताब्यात घेतले असुन सदर आरोपी हे पोलीस कोठडीत असुन गुन्हयाचा तपास सुरु आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 12 तासाच्या आतमध्येच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. सदरची कामगिरी ही अंकित गोयल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मितेश घट्टे (अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रा) भाऊसाहेब ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग अति. कार्य. लोणावळा विभाग) यांचे मागदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संजय जगताप, सहा. पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार अब्दुल शेख, सहा. फौजदार समीर शेख, पो. हवा. तावरे, पो. हवा. राय, पो. ना. गवारी, पो. ना. वाळुंज, पो. ना. विरणक, हिप्परकर, कळसाईत पो. कॉ. ननवरे, पो. कॉ. राऊळ, पो. कॉ. डोईफोडे, म.पो.कॉ. कुंदे, मपोकॉ बैरागदार यांनी केली आहे. ( Kamshet Police Busted Gang Who Beating And Robbing Citizens By Contacting Through Women )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात अंमली पदार्थ विकणाऱ्याला रंगेहाथ अटक, तब्बल पाऊणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
– पत्नीची छेड काढणाऱ्या भामट्यांना जाब विचारायला गेलेल्या पतीला बेदम मारहाण, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल, 3 आरोपी अटकेत