मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले, वडगाव मावळ शहराचे ग्रामदैवत, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे वतीने कालभैरवनाथ कार्तिक जन्माष्टमी उत्सव, सप्ताहाला मंगळवार दिनांक 28/11/2023 पासून सुरुवात आहे. दररोज पहाटे 5 ते 7 अभिषेक, सायंकाळी 6 वाजता हरिपाठ आणि 7 ते 9 श्रीमद भागवत कथा असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगळवार दिनांक 05/12/2023 रोजी कालभैरवजयंती निमित्त रात्री 10 ते 12 देवजन्माचे कीर्तन आणि बुधवार दिनांक 06/12/2023 रोजी सकाळी 10 ते 12 काल्याच्या कीर्तनाने आणि दुपारी12 नंतर महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशआप्पा ढोरे, अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड. अशोकराव ढमाले, ऍड. तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकारामबुआ ढोरे, सुभाषराव जाधव आणि सुनिता कुडे यांनी केले आहे. ( Kartik festival from Tuesday in Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हास्तरीय सहकार विघ्नहर्ता पुरस्कार । Talegaon Dabhade
– लोणावळा पोलिस ॲक्शन मोडवर! वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 60 पेक्षा अधिक व्यावसायिकांवर कारवाई
– भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका, घरबसल्या ‘असा’ करा भाडे करार