Dainik Maval News : पुढील आठवड्यात मंगळवारी ( दि. 26 नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपन्न होणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा तथा आळंदी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र देहूगाव येथे आगमन होणाऱ्या भाविकांची सुरक्षितता, सोयीसुविधा आणि नियोजनासाठी सोमवारी नगरपंचायतीत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक पार पडली.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, अजित महाराज मोरे, अभियंता संघपाल गायकवाड, शहर समन्वयक अक्षय रोकडे, नगररचना प्रमुख सुरेंद्र आंधळे, कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर यादव, तळवडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात आदी उपस्थित होते.
कार्तिक एकादशी निमित्त पुण्यनगरी देहूत श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शनार्थ राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचे आगमन होत असते. भाविकांची सुरक्षितता आणि सोयीसुविधाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या वतीने इंद्रायणी नदीचा घाट परिसर, गावातील अंर्तगत रस्ते स्वच्छता, डीडीटी पावडर औषध फवारणी, धूर फवारणी केली जाणार आहे.
मंदिर परिसर स्वच्छ करणे, बंद पथदिवे सुरू करणे, महावितरणाकडून गर्दी व धोकादायक ठिकाणचे लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, उघड्या डीपी बॉक्स दुरुस्ती संदर्भात उपाय योजना करणे, मंदिर परिसरामध्ये सी सी कॅमेरे सज्ज करणे, दर्शनार्थ भाविकांना दर्शन बारीतून सोडणे, कोकणातुन येणाऱ्या तसेच मुक्कामी असणाऱ्या दिंड्यांना शासकीय, निमशासकीय शाळा, कार्यालय उपलब्ध करून सोयीसुविधा करणे, नदी घाट परिसरात जीवरक्षक तैनात करणे, चेंजिंग रूम हिरकणी कक्ष उभारणे, पाणी टँकर पुरवठा, शौचालय उभारणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने औषधसाठा उपलब्ध करणे याबाबत नियोजन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र उभारणे, रुग्णवाहिका,अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, आदी कामांचे करण्याचे नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, वाहनतळ, बस थांबा, वाहतूक व्यवस्था करणे, अन्न औषध प्रशासनास हॉटेल व खाद्यपदार्थांची तपासणीसाठी पत्रव्यवहार करणे, यात्रा काळात चोरीच्या घटना घडू नये आणि भाविकांची सुरक्षितता यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात 72 टक्के मतदान, महिला वर्गाचे विक्रमी मतदान : कोण बाजी मारणार ? । Maval Vidhan Sabha
– द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळात यंदा विक्रमी मतदान, मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय सांगतो? वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? । Maval Vidhan Sabha