Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराज शोध संस्थान एवंम राजदीप कॉलेज मिर्जापूर बनारस येथील विद्यार्थ्यांसह काशीचे राजे राजबहादूर यांनी देहूगावात श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. श्रीक्षेत्र देहूतील देव दर्शन करीत राजे राजबहादूर यांनी मंदिरास सदिच्छा भेट दिली.
देहू संस्थानच्या वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते राजे राजबहादूर यांचा मंदिरात विशेष सन्मान करण्यात आला. माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या तर्फे श्री संत तुकाराम महाराज गाथा हिंदी आवृत्ती खंड भेट देऊन राजे राजबहादूर यांचा सन्मान करण्यात आला.
नितीन महाराज मोरे यांनी पाहुण्यांशी सुसंवाद साधत संत तुकाराम महाराज यांचे अभंग सांगत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन प्रसंगाची माहिती दिली. राजे राजबहादूर यांनी संत साहित्यावर संवाद साधत, देवदर्शन, श्री भंडारा डोंगर, देहू परिसर यांसह वारकरी संत परंपरांची माहिती जाणून घेतली. यावेळी राजे राजबहादूर यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला.
हभप जनार्धन महाराज पाटील, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, भूषण महाराज सूर्यवंशी, शिवजी घेगडे, दत्तात्रय हगवणे, गौतम खंडागळे, माणिक हिंगे, देहूतील विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
– दारू पिऊन साक्ष नोंदवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, वडगाव मावळ येथील प्रकार । Vadgaon Maval
– मावळातील धक्कादायक घटना ! रस्त्याच्या बाजूला पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरु । Maval Crime