Kishor Aware Murder Case : जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ आवारे यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. वडगाव मावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी हा सशर्त जामीन मंजूर केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वला पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर खळदे यांच्याकडून ॲड. सुधीर शहा, ॲड. अक्षय पटणी, ॲड. पार्थ चव्हाण बाजू मांडत आहे. कोर्टाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर चंद्रभान खळदे याना सशर्त जामीन मंजूर केला आहे. ( Kishor Aware Murder Case Bail granted to accused Chandrabhan alias Bhanu Khalde )
किशोर आवारे यांची हत्या आणि पोलिसांचा तपास –
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची दिनांक 12 मे 2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या जबाबातून आणि तपासात प्रमुख आरोपी आणि हत्येचा मास्टरमाईंड म्हणून चंद्रभान उर्फ भानू खळदे ह्यांचे नाव समोर आले होते. चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय 63) याना पोलिसांनी 8 जुलै रोजी नाशिक येथून अटक केली होती. कोर्टाच्या आदेशाने खळदेंची येरावडा तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी;
शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे)
प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (वय 32)
आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, दोघे रा. नाणे, ता. मावळ)
संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय 39, रा. आकुर्डी)
श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगल (वय 38, रा. वराळे, ता. मावळ)
गौरव चंद्रभान खळदे (वय 29, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)
मनीष शिवचरण यादव (वय 21, रा. चांदखेड. ता. मावळ. मूळ रा. बिहार)
चंद्रभान भानुदास खळदे (वय 63, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)
किशोर आवारे हत्या प्रकरणात पोलिसांकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या एसआयटीची स्थापना केली होती. तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा गट्टे यांच्याकडे हा तपास होता. त्यांच्या बदलीनंतर सहाय्यक पोलिस आयुक्त विशार हिरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.
अधिक वाचा –
– पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तळेगाव येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न
– संजोग वाघेरे पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म मिळाला, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘या’ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज । Maval Lok Sabha
– वन्यजीवांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार! जंगलातील पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, मावळमध्ये वनविभागाचा स्तुत्य उपक्रम