मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. किशोर आवारे हत्या प्रकरणात माजी नगरसेवक चंद्रभान तथा भानू खळदे हा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले होते. परंतू हत्या झाल्यापासून तो फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथकांची निर्मिती केली होती. परंतू त्याला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते, अखेर शनिवारी पोलिसांनी नाशिक येथून त्याला अटक केली. ( Kishor Aware Murder Case Pimpri Chinchwad Police Arrested Bhanu Khalde From Nashik )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 12 मे 2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद समोर किशोर आवारे यांच्यावर पहिल्यांदा गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येत माजी नगरसेवक भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव खळदे हा सहभागी असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. पोलिसांनी या घटनेचा तपास योग्य दिशेने करून मुख्य आरोपी भानू खळदे याला आता अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून भानू खळदे फरार होता. पोलिसांच्या हाताला लागणार नाही याची त्याने काळजी घेतली होती. तो त्याचा मोबाईल देखील बंद ठेवत असे. पण अखेर शुक्रवारी भानू खळदेला पोलिसांनी शोधून काढून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव खळदे यांनी या हत्येचा कट रचला होता. काही महिन्यांपूर्वी वृक्ष तोडी प्रकरणावरुन किशोर आवारे आणि भानू खळदे यांच्यात वाद झाला होता. त्यावरुन जुन्या नगरपरिषद परिसरात किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. त्याचाच राग बाप लेकाच्या मनात होता. त्यामुळे भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आरोपींना सुपारी दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
अधिक वाचा –
– कै. ॲड. शलाका खांडगे हिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पवना शिक्षण संकुलातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
– मोठी बातमी! मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही? मावळातील डी. वाय. पाटील कॉलेजच्या प्राचार्याला बजरंग दलाकडून चोप