स्पर्धा परिक्षा द्यायची आणि पोलिस बनायचं, हे स्वप्न उराशी बाळगून मावळ तालुक्यातील आंदर मावळ भागातील फळणे या दुर्गम खेड्यातील मुलगी श्रुती हिने तिच्या ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरु केला. गेले अनेक वर्षे-महिने तिने यासाठी कठोर परिश्रम घेतले. उन-वारा-पाऊस या सर्व परिस्थितीत तिने तीची मेहनत कायम ठेवली. अखेर तिच्या परिश्रमाचे चीज झाले आणि ती आज पोलिस उपनिरिक्षक बनली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरिक्षक अर्थात पीएसआय (PSI) पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आणि मावळ तालुक्यातील फळणे या छोट्याशा गावात आनंदाचा पुर आला. याचे कारण एका गरीब घरातील मुलगी या परिक्षेत पास होऊन पीएसआय बनली होती. आपल्या गावातील मुलगी पीएसआय बनल्याने सर्व गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरुन आला. तर स्वतः श्रुतीच्या कुटुंबातील सदस्य अद्यापही या अनंदाच्या डोहात पोहत आहेत. ( Shruti Malpote girl from Phalne village in Maval taluka became police sub inspector PSI through MPSC )
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उज्वल यश संपादन करीत आंदर मावळमधील फळणे गावातील कुमारी श्रुती संजय मालपोटे हिची पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांनीही तिचे अभिनंदन केले, तसेच तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिद्द,परिश्रम व स्वतःला सिद्ध करण्याचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे स्पर्धा परीक्षेत श्रुतीने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षांमधून उत्तम यश मिळवून ग्रामीण भागातील मुले-मुली विविध प्रशासकीय सेवांमध्ये स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे एक उत्तम करिअर म्हणून पाहिले पाहिजे, असे मत यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा –
– कुंडमळ्याची ट्रीप पडली महागात! इंद्रायणीत वाहून गेलेल्या ‘ओमकारचा’ शोध सुरु, ‘हा’ शेवटचा Video होतोय Viral, पाहा
– कै. ॲड. शलाका खांडगे हिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पवना शिक्षण संकुलातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप