जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दिनांक 12 मे) रोजी तळेगाव नगरपरिषदेसमोर निर्घृण हत्या झाली. या हत्येने संपूर्ण मावळ तालुका सुन्न झाला. परंतू या घटनेपाठोपाठ दिवंगत किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद देताना सुनिल शेळके यांचा उल्लेख केल्याने, आमदार सुनिल शेळके यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. ही माहिती मावळ तालुक्यात पसरताच सर्वत्र खळबळ माजली. ( kishore aware murder case )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुनिल शेळके यांचे कार्यकर्ते समर्थक यांनी शनिवारी सकाळपासूनच तळेगाव शहरात जमायला सुरुवात केली. तसेच आमदार शेळके यांच्याविरोधात कट रचला जातोय, त्यांना फसवलं जातंय, बदनाम केलं जातंय, अशी आरोळी सोशल मीडियातून दिली. यालाच प्रतिसाद साथ देत रविवारी (दिनांक 14 मे) सकाळी सुनिल शेळके समर्थकांनी शेळके यांच्या घरासमोर जमून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. सुनिल शेळके यांच्या पाठींब्यासाठी मोठा जनसमुदाय यावेळी जमला होता.
त्यामुळे एकीकडे हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत असताना आणि प्रमुख आरोपी गजाआड जात असताना, दुसरीकडे या प्रकरणात आमदार सुनिल शेळके यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना निर्माण होत असून तशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटताना दिसत आहे. यातच सुनिल शेळके यांचे समर्थक आणि वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर एक पोस्ट केली आहे, जी व्हायरल होत आहे. ( Vadgaon Mayor Mayur Dhore post for MLA Sunil Shelke )
मयूर ढोरे यांची फेसबूक पोस्ट जशीच्या तशी…
“खरं हाती येई पर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं…
या उक्ती प्रमाणं..
गोरगरीब जनतेची समाजाची आणि मावळ तालुक्याची प्रामाणिक पणे सेवा करणाऱ्या जनसेवक आमदार सुनील आण्णा शेळके यांची महाराष्ट्रभर वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन जाणीवपूर्वक आणि हेतूपूर्वक मावळच्या कुटूंब प्रमुख असणा-या या समाजसेवकाला खोट्या गुन्ह्यात फसवण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या आणि परिणामी तालुक्याचा होणारा उत्कर्ष थांबू पाहणाऱ्या जुलमी आणि खोट्या व्यक्तीसमूहाचा जाहिर निषेध करण्यासाठी आज आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यावर प्रेम करणारे हजारों चाहते, कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी जमा झाले होते. यावेळी आमच्या मोरया प्रतिष्ठान, मोरया महिला प्रतिष्ठान चे सभासद, संचालिका तसेच वडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने अण्णांना पाठिंबा देण्यासाठी भर उन्हात उपस्थित होते. यावेळी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..”
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वडिलांना कानाखाली मारल्याच्या रागातून मुलाने बनवला ‘मास्टर प्लॅन’? लगेच वाचा
– छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, प्रत्येक शिवभक्ताला होईल आनंद, वाचा…