कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील कोथूर्णे गावात दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी घडलेल्या निर्भया प्रकरणाचा निकाल काल (शुक्रवार, दि. 22 मार्च) रोजी लागला. सदर घटनेत 6 वर्षीय चिमुकलीचे आरोपीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून खून केला गेला होता. या प्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मावळ तालुका तसेच परिसरातील जनमानसात अत्यंत तीव्र आणि संतापजन्य प्रतिक्रिया उलटून अनेक आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. अखेर दीड वर्षांनी कोथूर्णेच्या निर्भयाला न्याय मिळाला. मावळ तालुक्यातील जनतेने यावर समाधान व्यक्त केले आहे. तर आमदार सुनिल शेळके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार – आमदार शेळके
कोथुर्णे येथील चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली आणि पीडित मुलीला न्याय मिळाला, याचे सर्व मावळवासीयांना मनापासून समाधान आहे. आरोपीने वरिष्ठ न्यायालयाकडे अपील केले तरी शिक्षा कायम राहावी, यासाठी आपण पीडित मुलीच्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहू, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. ( Koturne Nirbhaya case Accused sentenced to death Reaction of MLA Sunil Shelke )
कामशेत पोलिसांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पूर्ण केला तपास –
कामशेत पोलिस ठाण्यात वरील नमूद गुन्ह्याचा तपास पोलिसांनी अत्यंत कुशलतेने आणि जलदगतीने करून आरोपीना ताब्यात घेतले होते, व त्यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून नमूद गुन्ह्याची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू करावी, याकरिता शासनाला पत्र व्यवहार केला होता. त्याप्रमाणे शासनाने नमूद गुन्ह्याची द्रुतगती न्यायालयात सुनावणी सुरू करून शुक्रवार (दि. 22) रोजी नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अपहरण, खून, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या अधिनियमाखाली मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच सह आरोपी अर्थात प्रमुख आरोपीच्या आईला पुरावा नष्ट करणे या कलमाखाली सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ह्या गुन्ह्याची सुनावणी बी. पी. क्षीरसागर विशेष न्यायाधीश सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे यांच्या कोर्टात झाली.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल आणि 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली
– पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी कोर्टाचा मोठा निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा
– लोणावळा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणि मनसे पक्षाला खिंडार, ‘या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News