Dainik Maval News : लोणावळा शहरातील प्रभाग निहाय विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, युवा सेना लोणावळा शहर अधिकारी विवेक भांगरे, सल्लागार पराग राणे, उपविभाग प्रमुख नरेश घोलप, समन्वयक नंदू कडू उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने नांगरगाव, रामनगर, खंडाळा या ठिकाणी व्यायाम शाळा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच खंडाळा बाजारपेठ तलावाजवळ व लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर बस थांबा बांधण्यात यावा, कैलास नगर व डोंगरगाव ग्रामपंचायत येथील डोंगरगाव वाडी या ठिकाणी समाज मंदिर बांधण्यात यावे, ठोंबरे वाडी ते कुरवंडे या रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावेत, खंडाळा व रामनगर भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे अशा विविध कामांसाठी निधीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था ; पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री शाळा
– आता कोणत्याही कार्यक्रमावेळी ड्रोन वापरण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक, अन्यथा थेट तुरुंगवास । Pune News
– “कलाकाराला वय असते, परंतु कलेला वय नसते, ती चिरंजीव असते” – आमदार सुनिल शेळके