राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपा-शिवसेना(शिंदे गट)-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आज (दि. 24) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. त्यांच्याच नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, याची खात्री असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीसोबत राहून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच लोकसभा निवडणुकीत रासपला एक जागा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.’ असे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. ( Lok Sabha Election 2024 Mahadev Jankar Ratriya Samaaj Paksh RSP Party will remain in Mahayuti _
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha
– अजितदादांच्या आमदाराचा थेट इशारा, ‘…तर आम्ही मावळात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही’ । Maval Lok Sabha
– Maval Lok Sabha : महायुतीत मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…