देशात लोकसभा निवडणूकांची घोषणा (Lok Sabha Election 2024) झाली आहे. त्यामुळे अपोआपच आचारसंहिता (Code of Conduct) देखील लागू झाली आहे. दिनांक 4 जून रोजी अंतिम मतमोजणी असल्याने दिनांक 6 जून पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. याकाळात कुणीही आचारसंहितेचा भंग करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी 18002330102 आणि 1950 टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष 24 तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. ( Lok Sabha Elections 2024 Toll free number for complaints in case of violation of model code of conduct )
अधिक वाचा –
– वडगाव शहरात IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा छापा, अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 जणांविरोधात गुन्हा । Maval Crime
– मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway
– वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय । Vadgaon Maval