देशातील राजकारणातील एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची रद्द करण्यात आलेली खासदारकरी पुन्हा एकदा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने तशी अधिसुचना काढली आहे. ‘मोदी आडनाव प्रकरणी‘ राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. ( Lok Sabha Secretariat restores membership of Wayanad MP Rahul Gandhi after the Supreme Court Decision )
परंतू, दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवर प्रश्न उपस्थित करत शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे आता लोकसभा सचिवालयाने एक अधिसुचना जारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा एकदा बहाल करत असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. राहुल गांधी हे केरळ राज्यातील वायनाड येथून लोकसभेचे खासदार बनले आहेत. ( Lok Sabha Secretariat restores membership of Wayanad MP Rahul Gandhi after the Supreme Court Decision )
नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत ❤️ pic.twitter.com/HWKn3pG53l
— Congress (@INCIndia) August 7, 2023
सुप्रीम कोर्टाकडून दिलासा…
मोदी आडनाव प्रकरणात सुरत कोर्टाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. मोदी आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच सूरत कोर्टाच्या या निकालानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्य पदही गेले होते. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे त्यांना पुढची किमान सहा वर्ष निवडणुक लढवता येणार नव्हती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका केली. मात्र ती फेटाळून लावण्यात आली. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्या प्रकरणावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! पुणे रिंग रोडसाठी आतापर्यंत 125 एकराचा ताबा, जमीन मालकांना 250 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road
– मावळात तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीजेची लाईन पडून मृत्यू; महावितरणच्या गलथान कारभाराचा आणखीन एक बळी
– राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; तळेगाव शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा