लोणावळा शहरातील भुशी धरण परिसरात रविवारी भीषण दुर्घटना घडली. भुशी धरणाच्या मागील बाजूला आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये 5 पर्यटक वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ स्तरांवरून आलेल्या आदेशानंतर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनाच्या संदर्भात काही प्रतिबंध जाहीर करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहरातील सहारा ब्रिज, सहारा ब्रिज समोरील 3 छोटे धबधबे, भूशी डॅम, भूशी डॅम येथील रेल्वे विभागाच्या गेस्ट हाऊस वरचा भाग, भुशी डॅम सांडव्याच्या डाव्या बाजूचा वरचा भाग, टायगर पॉइंट, लायन्स पोईट, शिवलिंग पॉईट इत्यादी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील काही धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच मत झाल्याने तसेच जिल्हाधिकारी, पुणे यांनी जबाबदारीयुक्त पर्यटन राबविणे आवश्यक असल्याच्या सुचना दिल्या गेल्या असल्याने उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी पुढीलप्रमाणे काही प्रतिबंध जाहीर केले आहे. जे दिनांक 02 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू असणार आहे. ( Lonavala Bhushi Dam Tourism New restrictions imposed by administration No entry after 6 PM at Lions Point Tiger Point )
असे असतील निर्बंध –
1. सहारा पुलावर वाहने पार्कींग करण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
2. सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोट्या धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
3. भुशी धरणाच्या रेल्वेच्या गेस्ट हाऊस पासून बरच्या बाजूला जाण्यासाठी गेस्ट हाऊस पासून पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
4. भूशी धरणाच्या सांडव्याच्या डाव्या बाजूने चन विभागच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
5. लायन्स पॉईट / टायगर पोईट शिवलिंग पॉईंट येथे सायंकाळी 6 वाजलेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत पर्यटकांना जाण्यास पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
या आदेशाची पोलिस विभाग, वन विभाग, नगर पालिका रेल्वे विभाग यांनी संयुक्तरित्या अंमलबजावणी करावी. रेल्वे विभागाने गेस्ट हाऊसच्या बाजूने वर जाणाऱ्या रस्त्यावर बेरेकेटींग ची तात्काळ व्यवस्था करावी, लायन्स पॉईट, टायगर पॉईट, शिवलिंग पॉईट या ठिकाणी वन विभागाने कायमस्वरूपी वनपाल नियुक्त करण्याची व्यवस्था करावी. तसेच वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती पर्यटक हे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 मधील तरतुदी नुसार कारवाईस पात्र राहील असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल – सोमनाथ घार्गे । Raigad News
– कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय
– मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी