व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भुशी धरण परिसरातील कारवाईला तात्पुरती स्थगिती ; स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही – आमदार सुनिल शेळके

भुशी धरण परिसरातील अतिक्रमणांवर सुरू करण्यात आलेल्या धडक कारवाईला आमदार सुनील शेळके यांच्या मध्यस्थीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरती स्थगिती दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 3, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Action against encroachment in Bhushi Dam area

Photo Courtesy : Team Dainik Maval


भुशी धरणाच्या पाठीमागील धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर भुशी धरण परिसरातील अतिक्रमणांवर सुरू करण्यात आलेल्या धडक कारवाईला आमदार सुनील शेळके यांच्या मध्यस्थीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरती स्थगिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भुशी धरण परिसरात छोटे-मोठे व्यावसायिक व विक्रेते गेली कित्येक वर्षे व्यवसाय करत आहेत. त्यावर सुमारे पाचशे कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. दुर्घटनेनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने परिसरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केल्यामुळे ही सर्व कुटुंबे रस्त्यावर आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली व कारवाईस थांबविण्याची मागणी केली. त्यानुसार कारवाई तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ( Action against encroachment in Bhushi Dam area temporary adjournment due to MLA Sunil Shelke )

येत्या दोन दिवसांत आपण स्वतः प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या समवेत भुशी धरण परिसरात समक्ष पाहणी करणार आहोत. त्यानंतर संबंधित व्यावसायिक व विक्रेते यांच्याशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आमदार शेळके यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब विक्रेत्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही शेळके यांनी दिली.

या भागातील छोटे-मोठे विक्रेते व त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन कोणालाही हिरावून घेऊ देणार नाही. आपण शेवटपर्यंत या व्यावसायिक व विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहू.लोकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याची भूमिका राहील. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन शेळके यांनी केले.

अधिक वाचा –
– राजकीय पुनर्वसन, जातीय समीकरण, मतांची गोळाबेरीज.. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवार जाहीर
– कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल – सोमनाथ घार्गे । Raigad News
– कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय


dainik maval jahirat

Previous Post

ही बातमी वाचा मगच लोणावळ्यात जा, ‘ती’ दुर्घटना झाली आणि सगळंच बदललं ! पर्यटनाचे नवीन नियम लागू, ‘इथे’ थेट ‘नो-एन्ट्री’

Next Post

इंद्रायणी नदीवरील पूल, नवीन मतदार यादी, लाडकी बहीण योजना यांबाबत रवींद्र भेगडे यांचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval BJP leader Ravindra Bhegde

इंद्रायणी नदीवरील पूल, नवीन मतदार यादी, लाडकी बहीण योजना यांबाबत रवींद्र भेगडे यांचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.