लोणावळ्यात एका 60 वर्षीय महिलेला दोन जणांनी लाकडी दांडक्याच्या सहाय्याने मारहाण केली असल्याची तक्रार लोणावळा शहर पोलिसांत दाखल ( Lonavla City Police Station ) करण्यात आली आहे. रूफिना विलसन (वय 60 वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. न्यु तुंगार्ली, लोणावळा) या फिर्यादी महिलेनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित दोन आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ( Lonavala City Crime News Beating Old Woman Case Registered )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ( 2 नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला रूफिना विलसन (वय 60 वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. न्यु तुंगार्ली, लोणावळा) यांना अमित रिटा यांच्या घरासमोर अमित प्रेमजी रिटा आणि प्रेमजी रिटा यांनी लाकडी दांडक्याच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. त्यांच्या पाय-गुडघ्यांवर मारहाण करत त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपी अमित प्रेमजी रिटा आणि प्रेमजी रिटा (रा. न्यु तुंगार्ली, लोणावळा) यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकाँ/53 शेख हे करत आहेत.
अधिक वाचा –
– मोरगिरी किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या केरळच्या दुर्गवेड्या हमरासला शिवदुर्ग टीमकडून मदतीचा हात
– कामशेत पोलिसांची धडक कारवाई, मुंढावरे गावातील गावठी दारूची निर्मिती करणारी हातभट्टी उध्वस्त