लोणावळा शहरातील ( Lonavala News ) भोंडे विद्यालयात येत्या दिनांक 12 मार्च रोजी, कोण होणार लोणावळ्याचे महागायक महागायिका? ही गीत गायन स्पर्धा होणार होणार आहे. लोणावळ्यांत प्रथमताच हौशी कलाकारांसाठी भव्य अशी गीत गायन स्पर्धेचे आयोजन आधार फाउंडेशनच्या वतीने होत असून यातील विजेत्यांना भव्य बक्षिसे दिली जाणार आहेत.
आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे आणि प्रसिद्ध निवेदक गायक प्रदीप वाडेकर या कार्यक्रमाचे नियोजन करत असून इच्छुकांना दिनांक 2 मार्चपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेत विशेषता जेष्ठ कलाकार नागरिकांना संधी देण्याचे उद्देशाने 50 वर्षापुढील एका गटात स्पर्धा आणि पारितोषिके ठेवण्यात आले आहे. ( Lonavala City Song Singing Competition organized by Aadhaar Foundation )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
20 ते 50 गट आणि 50 वर्षापुढील एक गट अशी स्पर्धा असेल. यामध्ये दोन्ही गटात एक महागायक आणि एक महागायिका निवडली जाईल. हिंदी मराठी गीतामध्ये दोन निवड फेरीतून फायनलला ठराविक स्पर्धक असतील. स्पर्धा करोके ट्रक वर घेतली जाईल. प्रत्यक्ष लाईव्ह संगीतावर ज्यांना गायचे आहे, त्यांना आपले वादक आणावे लागणार आहे.
अंतिम फेरी व बक्षीस समारंभ बापूसाहेब भोंडे विद्यालयात होणार आहे. फायनल फेरीत पुण्यातील दिग्गज गायक मंडळी परीक्षक म्हणून उपस्थित असतील. लोणावळ्यातील या माहागायक महागायिका गायन स्पर्धेत सर्व कलाकारांनी भाग घ्यावा आणि रसिक प्रेक्षकांनी त्यांना प्रोत्साहांन देण्यासाठी 12 मार्चला कार्यक्रमाला उपस्तिथ रहावे असे, आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क – 9881024048 / 9923151770
अधिक वाचा –
– कान्हेफाटा जवळील श्री साईबाबा सेवाधाम इथे 12 दिवसीय ‘आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम’, मावळ-मुळशीतील 87 तरुण सहभागी
– वडगाव शहरातील बालगोपाळांसाठी स्तुत्य उपक्रम, अल्प दरात संस्कार वर्ग सुरु, वाचा अधिक