Dainik Maval News : लोणावळा धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे लोणावळा धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात 411 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. पर्ज्यन्यवृष्टीत वाढ होत असून विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सततच्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहराजवळील लोणावळा धरण भरले आहे. त्यामुळे धरणाच्या काठावरून पाणी ओव्हरफ्लो झाले असून त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद प्रशासन हाय अलर्ट मोडवर आहे. प्रशासनाने हुडको परिसर आणि भांगरवाडी तसेच बाजार पेठेच्या काही भागातील नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या असून गरज पडल्यास तातडीने तसा निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी आवश्यक असलेले महत्त्वाचे सामान एकत्र करून ठेवाव्यात अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत. ( Lonavala dam overflow Discharge of water in Indrayani river has started )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, घाट रस्ता बंद, दरड हटविण्याचे काम सुरू । Pune News
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश, सोमवार 29 जुलैपर्यंत बंदी, वाचा आदेश
– मोठी बातमी ! वडीवळे धरणातून कुंडलिका नदीत 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी