लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना स्वतः गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की काही व्यक्ती स्वतःच्या फायद्याकरिता कल्याण नावाचा मटका घेत आहेत. अशी माहिती मिळाल्याने लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मौजे वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) या गावाच्या हद्दीत दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी मटक्यावर अचानक छापा टाकला. ( Lonavala police Satya Sai Karthik Squad Raid Matka Hideout In Vehergaon Assets Worth Lakhs Seized )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यावेळी सदर ठिकाणी 1) संतोष ज्ञानदेव बोत्रे रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) 2) राहुल अशोक गायकवाड रा. कार्ला (ता. मावळ, जिल्हा पुणे) हे दोघे मटक्याच्या साहित्यासह मटका खेळताना मिळून आले असून 3) संजय सदानंद रेवाळे रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) 4) चंद्रकांत धावजी देवकर रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) 5) जयेश जनार्दन खोत रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) 6) सिद्धार्थ फकीरराव खरात रा. केशवनगर (ता. मावळ, जिल्हा पुणे) 7) प्रमोद दामू अहिरे रा. शिलाटणे (ता. मावळ, जिल्हा पुणे) 8) दत्ता फुलचंद जाधव रा. वेहेरगाव (ता. मावळ, जिल्हा पुणे) असे मटका खेळत असताना मिळून आले आहेत.
सदर व्यक्तींच्या ताब्यात एकूण 17 लाख 29 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. तसेच यापुढे लोणावळा ग्रामीण, लोणावळा शहर, कामशेत, वडगाव पोलीस ठाणे मध्येही कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
सदरची कारवाई ही सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग त्यांचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव, पोलीस अंमलदार नायकुडे, शिंदे, होळकर, पवार, शिंदे यांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्फत ही माहिती देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– हिराबेन मोदी अनंतात विलिन! पंतप्रधान मोदींनी दिला मातेला मुखाग्नी, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
– मोठी बातमी! क्रिकेटपटू रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; पाय मोडल्याची भीती