कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार, दिनांक 14 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप, माजी आमदार नसीम खान उपस्थित होते.
बैठकीनंतर महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद झाली. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी जयंत पाटील यांनी माहिती दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या बैठकीत या निवडणुकींचा आढावा घेण्यात आला. यात भ्रष्टाचार, विविध तपास यंत्रणांचा गैरवापर आणि स्थानिक दृष्ट्या जनतेला त्या सरकारचा आलेल्या अनुभवांचा आढावा घेतला गेला. महाविकास आघाडी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील निकालाची तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी चर्चा केली. उन्हाळा असल्याने महाविकास आघाडीच्या सभा थोड्याशा प्रलंबित ठेवल्या आहेत. पावसाचे वातावरण पाहून सभा सुरु करणार आहोत. तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आमच्या आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत निर्णय घेणार आहोत”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव… pic.twitter.com/gMNMWtW3JU
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 14, 2023
“महाराष्ट्रातील जनतेला ठाम पर्याय सक्षमपणे देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल. महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून मोठ्या अधिक ताकदीने पुढील काळात काम करेन,” असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– मळवली येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 6 जोडपी विवाहबद्ध, मंत्री तानाजी सावंत यांचीही उपस्थिती
– विश्वजित श्रीरंग बारणे यांची युवासेना मावळ व पुणे लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती