राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार, दिनांक 21 मे) जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्याचा निकाल हा 93.37 टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, तर विभागांमध्ये पुन्हा एकदा कोकण विभाग अव्वल ठरला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी 1 नंतर उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पद्धतीने चेक करता येणार आहे. परंतू ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाही अशा विद्यार्थ्यांनाही त्यांचा निकाल ऑफलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ( Maharashtra Board 12th Result Declared )
इंटरनेट नसेल तर असा चेक करा निकाल; ( How To Check HSC Result 2023 via SMS on Mobile )
ज्यांच्याकडे इंटरनेट नाही ते विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातून त्यांचा निकाल चेक करु शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
– तुमच्या मोबाईलमधून एक एसएमएस पाठवावा लागणार आहे.
– त्याच्या सुरुवातीला कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करुन त्यापुढे रोल नंबर टाइप करावा लागेल.
– हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
– त्यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.
हेही वाचा – बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका ! कोकण विभाग पुन्हा अव्वल, वाचा निकाल सविस्तर । HSC Exam2024
जर इंटरनेट असेल तर खालीलपद्धतीने चेक करा तुमचा निकाल –
बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
असा चेक करा तुमचा निकाल ;
स्टेप 1) बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप 2) बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप 4) बारावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
बारावीच्या परीक्षेला किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14,33,371 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी 93.37 आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल 95.44 % असून मुलांचा निकाल 91.60 % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 % ने जास्त आहे.
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड । Sanjeev Kumar Bodake
– अवकाळी पावसात हायमास्ट दिव्यांची पडझड, वडगाव राष्ट्रवादीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन । Vadgaon Maval
– महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval