मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. ही योजना राज्यातील बारावी पासून पुढील सर्व प्रकारचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करीता 5 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली असून या योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे. विनाअनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना, उद्योग, महामंडळामार्फत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांना कुशल/ अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल. ( Maharashtra Govt Chief Minister Youth Work Training Scheme Information and Application Process )
- कार्य प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा राहणार असून या कालावधीत बारावी उत्तीर्ण उमेदवारांना 6 हजार रूपये, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णांना 8 हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना 10 हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे. उद्योगक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे (इंटर्नशिप) उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार आहेत.
याशिवाय शासकीय योजनांची माहिती जनतेला व्हावी आणि त्या माध्यमातून जनतेला लाभ मिळावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमागे 1 व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे 1 असे एकूण 50 हजार योजनादूत राज्यात नेमण्यात येणार आहेत. यांचेही विद्यावेतन या योजनेतून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही युवांना कुशल, अर्धकुशल प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणार असून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– लहान वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये आकर्षक रिंगण सोहळा संपन्न । Talegaon Dabhade
– आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News
– रोटरी सिटीकडून भुशी धरण दुर्घटनेत एका मुलीचे प्राण वाचविणारे डॉ. सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार । Talegaon Dabhade