अजितदादांची सोबत करत मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके हे पुन्हा एकदा सत्ताधारी बनलेत. मावळ तालुक्याच्या हितासाठी आपण दादांसोबत आणि सत्तेत गेल्याचे आमदार सुनिल शेळकेंनी त्यावेळी सांगितले होते. अन् त्यानुसार आता सुनिल शेळके ह्यांनी पावसाळी अधिवेशनात मावळ तालुक्यासाठी तब्बल 39 कोटी 62 लाखांचा निधी मिळवला आहे. ( Maharashtra Monsoon Session 2023 Due To MLA Sunil Shelke Efforts 39 Crore Fund For Maval Taluka )
”पुरवणी अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशन जुलै 2023 अंतर्गत मावळ तालुक्यातील कामांना सुमारे 39 कोटी 62 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांचे आभार” अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
प्राप्त निधीतून होणारी प्रस्तावित कामे;
1. कान्हे इथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटरच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम करणे – 9 कोटी 12 लाख
2. पौड – कोळवण – लोणावळा रस्ता पवना नदीवर मोठ्या पुलाच्या जोड रस्त्याचे भूसंपादन करणे – 2 कोटी 20 लाख
3. सांगवडे – दारुंब्रे – चांदखेड – आढले – येलघोल – येळसे रस्ता प्रजिमा 105 ची किमी 18/500 ते 21/500 व 32/500 ते 35/600 ची सुधारणा करणे (भाग आढले ते डोणे व येलघोल ते येळसे) – 6 कोटी 50 लाख
4. कान्हेफाटा – टाकवे वडेश्वर – सावळा रस्ता प्रजिमा 22 किमी 24/00 ते 30/00 ची सुधारणा करणे (भाग – बोरीवली ते कुसूर) – 8 कोटी
5. सोमाटणे – कडधे रस्ता प्रजिमा 28 किमी 8/500 ते 9/500 ची सुधारणा करणे (भाग – पिंपळखुटे ते शिवणे) – 1 कोटी 30 लाख
6. एकविरा देवी ते मळवली – भाजे लेणी लोहगड रस्ता प्रजिमा 25 किमी 2/200 ते 4/00 ची सुधारणा करणे (भाग – कार्ला ते मळवली) – 2 कोटी 50 लक्ष
7. औंढे – देवले – मळवली – पाटण – बोरज – पाथरगाव ते रा.म. मार्ग 04 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 107 किमी 7/500 ते 1200 ची सुधारणा करणे व लहान पुलांचे बांधकाम करणे (ता. मावळ, जि. पुणे) (भाग – बोरज ते पाथरगाव) – 4 कोटी 50 लाख
8. माऊ – डोंगरवाडी रस्ता ग्रामा 135 रस्ता 0 ते 200 ची सुधारणा करणे – 2 कोटी
9. कामशेत – नाणे – गोवित्री – जांभवली – कोंडेश्वर मंदिर रस्ता प्रजिमा 78 किमी 9/00 ते 13/00 ची सुधारणा करणे – 3 कोटी 50 लाख
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– बेकायदा पार्किंग ते चौकाचौकात सीसीटीव्हीची गरज; मनसे शिष्टमंडळाने घेतली नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची भेट । Vadgaon Maval
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन, पाहा तारीख आणि ठिकाण
– कामशेत पोलिसांकडून गावठी बंदूक व जिवंत काडतुसांसह एकाला अटक, गोठ्यात लपवली होती बंदूक, वाचा सविस्तर