पवनानगर महावितरण कार्यालयाच्या हद्दीतील धामणदरा आपटी इथे वीजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना कर्मचारी अशोक रोहिदास मुळे (वय 27, सध्या रा. शेवती वसाहत, येळसे, ता. मावळ) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अशोक मुळे हे शुक्रवारी (दिनांक 19 मे) 6.00 सायंकाळी विजेच्या खांबावर चढले असता कुणी तरी जनरेटर किंवा इनव्हरटर चालू केला असता सप्लाय विरुद्ध दिशेने चालू झाल्यामुळे त्यांचा जागीच प्राण गेला. लोहगड दुधिवरे आपटी या ठिकाणी वायरमन म्हणून ते कार्यरत होते. ( Mahavitaran worker from Pavananagar died due to electric shock while working at Dhamandara )
वीज प्रवाहाचा धक्का बसल्याने अशोक मुळे हे खांबावरच लटकले, ही घटना सोबत असणाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत ते विद्युत वाहिनीमध्ये अडकले होते. ग्रामीण भागात ही घटना घडल्याने मदतीसाठी कुणीही आले नाही आणि त्यांना खांबावरून खाली घेण्यास उशीर झाला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ काले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! उर्से टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, मुलीचा जागीच मृत्यू
– कातवी गावातील ‘पहिली महिला पोलिस’ बनली ‘क्षितिजा चव्हाण’, मावळकन्येवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव