मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (मंगळवार, दिनांक 13 जून) रोजी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारा एक ऑईल टँकर लोणावळा शहराच्या हद्दीत कुणेगाव पुलावर पलटी झाला आणि आगीचा भडका उडाला.
टँकरमधील ऑइल खाली सांडल्याने पुलाखाली गाड्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. ही आग इतकी भयंकर होती की यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची आणि दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. ( Major Fire Breaks Out After Oil Tanker Meets With Accident On Mumbai Pune Expressway Near Lonavala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई लेनवर हा अपघात झाला असला तरीही आगीचे स्वरुप अतिप्रचंड असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे तासभऱ ठप्प होती. घटनेची माहिती मिळताच आयआरबी, पोलिस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी, लोणावळा पोलीस, फायरब्रिगेड, महामार्ग पोलिस आदी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी यु्द्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले.
अधिक वाचा –
– अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद
– ‘इंद्रपुरी’तील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण । MLA Sunil Shelke