मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते करावेत, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेच्या वतीने मावळ तहसील कार्यालयावर गुरुवारी (दि. 7 मार्च) धरणे आंदोलन करण्यात आले. मावळ पंचायत समिती चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता करण्याची मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला गहुंजे ते कुसगाव (लोणावळा) पर्यंत महामार्गाच्या हद्दीतून सेवा रस्ते करावेत. द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित केलेल्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना महामार्गावर नोकरी, उद्योग, व्यवसायात प्राधान्य द्यावे. एक्स्प्रेस वे वरील टोलनाक्याला उर्से टोलनाका असे नाव द्यावे, आदी मागण्यांसाठी किसान मोर्चा व जमीन हक्क परिषद सातत्याने अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. ( make service road on both sides of mumbai pune expressway demand by maval taluka land rights council )
परंतू, याची अद्यापही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. सेवा रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ महामार्गाचा वापर करत आहेत. यात अपघात होऊन मृत्यु झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे द्रुतगती महामार्गालगत सेवा रस्ता व्हावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आंदाेलकांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले.
अधिक वाचा –
– कामशेत येथील पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे प्रवासादरम्यान निधन । Journalist Chandrakant Lole passed away
– विमानाला लागणाऱ्या इंधनाचा काळा बाजार, सोमाटणे येथे पोलिसांची धडक कारवाई, 5 जण रंगेहात ताब्यात । Pune Crime
– मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती । Maval News