मणिपूर इथे महिलांवर झालेल्या अन्याया विरुध्द मावळ तालुक्यात बिरसा ब्रिगेड संघटनेमार्फत तसेच भटका बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करत वडगाव मावळ इथे हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाजीराव सुपे यांनी मोर्चाचे सुत्रसंचालन केले. तर सभेदरम्यान प्रस्ताविका मांडताना चिमटे सर यांनी सरकारची आदिवासी समाजाबद्दल असलेली उदासीनता यावर बोलताना चांगलीच कानउघाडणी केली. ( Manipur violence Birsa Brigade Organization march on Vadgaon Maval Tehsil Office )
संघटनेतील ढाण्या वाघ अशी बिरुदावली असलेले संजय भांगे यांनी मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अन्याया संदर्भात आपले मत व्यक्त केले. त्यानंतर मावळ तालुक्यातील बिरसा ब्रिगेडची मातृशक्ती प्रमुख तळपे मॅडम यांनी त्यांच्या जहाल शब्दात मणिपूर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच माऊली भाऊ सोनवले यांनी प्रखर शब्दात मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त करुन मोर्चेकरांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर बिरसा ब्रिगेड मावळच्या सर्व शिलेदारांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. त्यात मणिपूर येथील मुख्य आरोपी तसेच त्या घटनेतील सर्व आरोपी यांना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली. तसेच पुन्हा अशा प्रकारचा अन्याय आदिवासी समाजावर होऊ नये अशी भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. केंगले सर यांनी मोर्चेकरांचे आभार मानले. मोर्चेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या तरुण वर्गाने सरकारचा व मणिपूर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मणिपूर हिंसाचाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये जमावाने दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढल्याचे दिसत होते, तसेच त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच देशभर संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर ही घटना ताजी असताना पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात दोन आदिवासी महिलांना कथितपणे नग्न करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. एकंदरीत महिला अत्याचाराच्या या घटनांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. ( Manipur violence Birsa Brigade Organization march on Vadgaon Maval Tehsil Office )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मणिपूरच्या घटनेवर बोलूयात…!’ छात्रभारतीतर्फे खुले चर्चासत्र, विविध समविचारी संघटनांचा सहभाग
– मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध; वडगाव मावळ शहरात ट्रायबल फोरमकडून भव्य मोर्चा
– मणिपूर महिला अत्याचार घटनेवर मावळ तालुक्यात काँग्रेस आक्रमक, थेट तहसील कार्यालयावर काढला मोर्चा आणि…