मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी अखेरची लढाई असे सांगत अंतरवाली सराठी येथून 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघालेली मराठा समाजाची पायी यात्रा मार्गक्रमण करत आज (दि. 24 जानेवारी) मुक्कामासाठी मावळ तालुक्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा येथे 100 एकरात मराठा समाजातील लाखो आंदोलक मुक्काम करणार आहे. तत्पुर्वी मंगळवारी (दि. 23 जानेवारी) पुणे जवळील खराडी येथे मुक्कामी राहिलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि लाखो आंदोलक आज पुढे कसे मार्गक्रमण करणार आहेत, याचे वेळापत्रक समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आज बुधवार, दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी मराठ्यांची मुंबई वारी खालील प्रमाणे असणार आहे;
पुणे / पिंपरी-चिंचवड शहरातील रॅली मार्ग पुढीलप्रमाणे असेल –
वाघोली – चंदननगर – हॉटल हयात चौक – गुंजन चौक येरवडा – बंड गार्डन – वाडिया कॉलेज – जहांगीर हॉस्पिटल – आरटीओ – संचेती हॉस्पिटल – शिवाजीनगर – पुणे विद्यापीठ – औंध – सांगवी फाटा – जगताप डेरी – काळेवाडी फाटा – डांगे चौक – चाफेकर चौक, चिंचवडगाव – चिंचवड स्टेशन – जूना पुणे-मुंबई हाय वे – देहू रोड मार्गे तळेगाव – मुक्काम लोणावळा.
वेळेचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे (प्राथमिक अंदाजे) –
दुपारी 3 वाजता – चापेकर चौक, चिंचवडगाव
दुपारी 3.30 वाजता – चिंचवड स्टेशन
सायंकाळी 4 वाजता – आकुर्डी, खंडोबा माळ
सायंकाळी 4.30 वाजता – निगडी
सायंकाळी 5 वाजता – भक्ती शक्ती शिल्प, निगडी
सायंकाळी 5.30 – देहूरोड
सायंकाळी 6.30 – तळेगाव दाभाडे
सायंकाळी 7 – वडगाव मावळ
सायंकाळी 7.30 – कामशेत
सायंकाळी 8.00 – कार्ला
रात्री 8.30 – श्री संत तुकाराम महाराज पादुका स्थान सभा, मुक्कामी (वाकसई फाटा)
( Maratha Reservation Manoj Jarange Patil Mumbai Padayatra Schedule Maval Taluka Lonavala Pimpri Chinchwad )
अधिक वाचा –
– मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव सज्ज; जागोजागी संघर्षयोद्ध्याच्या स्वागताचे बॅनर । Manoj Jarange Patil In Lonavala Maval
– महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मण शितोळे यांची निवड, मावळ तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी
– विविध सरकारी योजनांबाबत महिलांमध्ये जनजागृती; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि बेलस्टार यांचा संयुक्त उपक्रम । Alandi News