महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्य भरातील गावांगावातून मराठा समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांत साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर, अनेक ठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात येत आहेत. मावळ तालुक्यातही साधारण 40 गावांत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. टाकवे बुद्रुक गावात मराठा आंदोलकांनी मंगळवारी, दि. 31 ऑक्टो. गावात मशाल मोर्चा काढला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ टाकवे बुद्रुक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी “एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मनोज जरांगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है. छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत टाकवे गावातील हाजारोंच्या संख्येने मराठा बांधव मशाल मोर्चात सामील झाले होते. म्हाळसाकांत चौक, हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बुद्ध नगर, बस स्टॉप आणि शेवट म्हाळसाकांत चौक जिथे साखळी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी शिववंदना घेऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.
तसेच, ‘जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तसा निर्णय होत नाही, तो पर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावात येऊ नये, जर कुणीही आरक्षणाच्या निर्णयाच्या शिवाय गावात प्रवेश केला तर त्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहील,’ असा निर्णय टाकवे बुद्रुक येथील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. तसेच, गावांत साखळी उपोषण सुरू केले आहे ते पुढेही सुरू राहील, असे निवेदन मावळ तहसील कार्यालय व वडगाव पोलिस ठाण्याला दिले आहे. ( Maratha Reservation Torch march by Sakal Maratha community in Takve Budruk Maval Taluka )
अधिक वाचा –
– Breaking! मराठा आरक्षणासाठी मावळ तालुक्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून पदांचे राजीनामे
– मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवून लुटमार करणारे तीनजण ताब्यात । Maval Crime
– ‘मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत’ – मुख्यमंत्री