व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Ruplekha Dhore Funeral । मावळच्या पहिल्या महिला आमदार स्व. रुपलेखा ढोरे यांना हजारो मावळकरांचा साश्रूनयनांनी निरोप

पंचायत समितीच्या उपसभापती ते तत्कालीन राज्यमंत्र्यांचा पराभव.. अशी होती रुपलेखाताई ढोरे यांची राजकीय कारकीर्द

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 29, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Maval Assembly's first female MLA Ruplekha Dhore passes away funeral held at Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळच्या माजी व पहिल्या महिला आमदार स्व. रुपलेखा खंडेराव ढोरे यांचे बुधवारी (दि. २९) निधन झाले व बुधवारी सायंकाळीच वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिनसंस्कार देखील करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो मावळकर उपस्थित होते. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने रुपलेखा ढोरे यांचे निधन झाले होते, त्या ७५ वर्षांच्या होत्या. पुणे शहराचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांची कन्या ते मावळची ‘भाग्यरेखा’ असा दैदिप्यमान आणि आदर्शवत राजकीय जीवप्रवास रुपलेखा ढोरे यांचा होता.

रुपलेखा ढोरे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज (भाऊ) ढोरे व उद्योजक सचिन (बाळा) ढोरे यांच्या त्या मातोश्री होत. तर, मावळ पंचायत समितीचे दिवंगत माजी सभापती खंडेराव उर्फ दादासाहेब ढोरे यांच्या त्या पत्नी, तर पुणे शहराचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांच्या त्या कन्या होत्या.

मावळ पंचायत समितीच्या उपसभापती –
रुपलेखा ढोरे यांनी १९९२ साली तत्कालीन वडगाव-इंदोरी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्याच काळात पंचायत समितीमध्ये काँग्रेस व भाजपाचे समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठ्या टाकून उपसभापतिपदाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत त्या विजयी ठरल्या आणि तीन वर्षे उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळला.

नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष
राजकारणासह सामाजिक शिक्षण क्षेत्रातही रुपलेखा ढोरे यांनी आपला ठसा उमटविला होता. तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या स्कूल कमिटीच्या चेअरमन म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. नंतर त्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या सल्लागार मंडळावर कार्यरत होत्या.

मावळच्या पहिल्या महिला आमदार –
मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या प्रथम महिला उमेदवार म्हणून त्यांनी सन १९९५ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. तत्कालीन राज्यमंत्री मदन बाफना यांचा पराभव करत त्या मावळच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्या आमदार झाल्या. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तालुक्यात ५५ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. मावळ तालुका टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच मंगरूळ येथील आंद्रा धरणाच्या कामालाही त्यांच्या कार्यकाळात सुरुवात झाली. मावळच्या विकासात त्यांचे भरीव योगदान कायम स्मरणात राहील.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
– महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप
– Photo : अजित दादा पवार यांचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ पंचतत्वात विलीन.. लाखो चाहते कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना साश्रूनयनांनी अखरेचा निरोप !

Next Post

अजितदादांच्या निधनानंतर मावळातील प्रचार थांबला ; राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाकडूनही प्रचाराला स्थगिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

अजितदादांच्या निधनानंतर मावळातील प्रचार थांबला ; राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाकडूनही प्रचाराला स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.