मावळ तालुका भाजपाचे विधानसभा निवडणूकप्रमूख रवींद्र भेगडे यांनी तालुक्यातील विविध विषयांबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. यात प्रामुख्याने कार्ला – मळवली मार्गावरील पूल, विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करणे, यासह शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना दाखले देणे या विषयांबाबत निवेदन दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहेत मागण्या?
1. कार्ला – मळवली गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने व पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांच्या उद्योग व्यवसाय धोक्यात आला असून प्रशासनाने तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा. हे काम पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांच्या होणाऱ्या अडचणी संदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संताप व्यक्त केला आहे.
2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहrण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी अत्यावश्यक असणारे उत्पन्न प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून द्यावे.
3. मावळ विधानसभा मतदार संघातील बोगस व दुबार मतदारांची नावे त्वरित कमी करावी जेणेकरून बोगस मतदारांना आळा बसेल आणि भाजपाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नव मतदार नोंदणी अभियानास सहकार्य मिळावे व ऑनलाईन अर्ज जलद गतीने भरावे.
यावेळी रवींद्र भेगडे यांच्या समवेत भाजपा पुणे जिल्हा ओबीसी आघाडी अध्यक्ष दत्तात्रय माळी आणि मा सरपंच संतोष बांदल उपस्थित होते. ( Maval BJP leader Ravindra Bhegde statement to tehsildar regarding Ladaki Bahine scheme & voter list )
अधिक वाचा –
– ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी पैसे मागितले तर मला सांगा, कुणालाही पैसे देऊ नका – आमदार सुनिल शेळके
– राजकीय पुनर्वसन, जातीय समीकरण, मतांची गोळाबेरीज.. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपाकडून विधान परिषदेसाठी 5 उमेदवार जाहीर
– कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल – सोमनाथ घार्गे । Raigad News