Dainik Maval News : कान्हे गावातील युवा कार्यकर्ते आणि मावळ क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख, कान्हे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राजश्री सदाशिव सातकर आणि सदाशिव आनंदराव सातकर यांचे चिरंजीव संपत सदाशिव सातकर (वय ४५) यांचे गुरुवारी (दि. २७) अल्पशा आजाराने निधन झाले.
मावळ तालुक्यातील अनेक क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन करणार व्यक्तिमत्व, फस्ट ग्रीन क्रिकेट क्लबचा संस्थापक तसेच बहुसंख्य मित्र परिवार असलेलं व्यक्तिमत्व हरपल्याने क्रिकेट खेळाडूंवर शोककळा पसरली. त्यांच्यामागे आई, वडील, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे.
मावळ तालुक्यातील उत्तम व गुणी क्रिकेटर म्हणून सुपरिचित असलेले संपत सातकर मितभाषी व सुस्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. वडिवळे येथे क्रिकेटचे मैदानही त्यांनी तयार करून मावळच्या युवक खेळाडूंसाठी क्रिकेट अकॅडमी स्थापन केली होती.
त्यांच्यावर गुरुवारी (दि.27) दुपारी कान्हे स्मशानभूमी खापरे ओढा (ता.मावळ जि. पुणे) येथे अंत्यविधी करण्यात आले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक
