व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांच्यासमोर आहेत ‘ही’ आव्हाने । Maval MP Shrirang Barne

लोकसभेची रणधुमाळी संपली आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा श्रीरंग आप्पा बारणे हे विजयी झाले. सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत आप्पा बारणे खासदार झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभेची रणधुमाळी संपली आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा श्रीरंग आप्पा बारणे हे विजयी झाले. सलग तिसऱ्यांदा प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत आप्पा बारणे खासदार झाले. त्यानंतर केंद्रातही सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे तिसऱ्या टर्ममध्येही बारणे हे सत्तेत असतील. यादरम्यान बारणे यांचे नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत होते. परंतू शिवसेनेच्या वाट्याला एकच राज्यमंत्रिपद आले आणि तेही प्रतापराव जाधवांच्या हाती गेल्याने बारणे हे निव्वळ हॅटट्रीकचे खासदार इतकेच राहिले. असे असले तरीही सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याने मावळ मतदारसंघातील काही प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याचे आव्हान आता बारणेंपुढे आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघात अद्यापही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक प्रश्न हे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेत. त्यामुळेच बारणेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांनी ‘दहा वर्ष सरले मग प्रश्न का उरले’ असा प्रचार केला होता. त्यामुळे आता बारणे पुन्हा निवडून आल्याने त्यांना या प्रश्नांना आता हात घालावाच लागेल. विजयाची हॅट्ट्रिक साजरी करत असतानात मतदारसंघापुढील प्रश्न सोडविण्याची जबाबदारी बारणेंवरच आहे. नदी सुधार, रेल्वे, मेट्रो विस्तारीकरण, महामार्ग रुंदीकरण, रेडझोन हद्द कमी करणे, पर्यटनस्थळांचा विकास, पर्यटनास चालना, रोजगारनिर्मिती करणे अशी अनेक आव्हाने त्यांना पेलावी लागणार आहेत. ( Maval Lok Sabha Constituency Pending Question Challenge to MP Shrirang Barne )

मावळ लोकसभेत एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहाही विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे प्रश्न आहेत.
मावळ विधानसभा – या मतदारसंघात किवळे, रावेत, देहूरोड, तळेगाव या भागामध्ये लष्करी क्षेत्र आहे. येथील शेतकऱ्यांना वाढीव परतावा देण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याचबरोबर किवळे, देहूरोड, रावेत, प्राधिकरण या परिसरातील रेडझोनची हद्द कमी करणे हा प्रश्न आहे. प्राधिकरणमधील जुन्या शेतकऱ्यांना परतावा देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर मावळ मतदारसंघांमध्ये पवना, मुळा, इंद्रायणी या प्रमुख नद्यांचे कार्यक्षेत्र येते. या नदीच्या परिसरामध्ये नागरिकीकरण, औद्योगिकीकरण झाल्याने नद्या प्रदूषित झाल्याचत. त्यांच्या स्वच्छतेसाठी काम करावे लागणार आहे.

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा – या मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, रस्ते सुधारणे, पाण्याची समस्या मिटवणे आदी प्रश्न आहेत. पिंपरीपर्यंत आलेली मेट्रो भविष्यात तळेगावपर्यंत नेणे, हिंजवडी-चाकणला जोडणारी प्रस्तावित मेट्रो मंजूर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुणे-मुंबई लोहमार्गाचे क्षेत्र मतदारसंघात आहे. तिसरा आणि चौथा ट्रॅक, आकुर्डीतील रेल्वे जंक्शन, रेल्वे ट्रॅक संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.

पर्यटनासाठी काम करण्याची गरज – देहूगाव, कार्ला, महड, चिंचवड ही तीर्थक्षेत्रे, भाजे, घारापुरीची लेणी, लोहगड, विसापूर हे किल्ले आणि खंडाळा, लोणावळा, माथेरान या पर्यटन क्षेत्रांचा एकत्रित विकास आराखडा करून पर्यटन विकासाला चालना देणे, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मावळ, कर्जत, उरण परिसरातील आदिवासी पट्ट्यातील भागांमधील विकास करणे हेही प्रमुख आव्हान आहे.

अधिक वाचा –
– मावळच्या 4 तरूणांनी सायकलवरून केली पंढरपूरची वारी, दोन दिवसात 544 किलोमीटर अंतर पूर्ण
– इंद्रायणी नदीची दुरावस्था दूर करा ! लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरपरिषदेला निवेदन । Lonavala News
– पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे


Previous Post

लोणावळ्यात पर्यटकांचा ‘पूर’, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ‘उच्चांक’, वाहनांची संख्या वाढल्याने ‘वाहतूककोंडी’ । Lonavala News

Next Post

सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजारावर मोफत उपचार, जन आरोग्य योजनेचा अवकाश वाढणार, शिंदे सरकारचा मेगा प्लॅन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM-Eknath-Shinde

सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजारावर मोफत उपचार, जन आरोग्य योजनेचा अवकाश वाढणार, शिंदे सरकारचा मेगा प्लॅन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.