व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी धरले अजितदादांचे पाय, नेमकं काय घडलं? वाचा । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची शुक्रवारी (दि. 26 एप्रिल) भेट झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 27, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Sanjog Waghere Patil and Ajit Pawar met

Photo Courtesy : Team Dainik Maval


Sanjog Waghere Patil and Ajit Pawar Met : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची शुक्रवारी (दि. 26 एप्रिल) भेट झाली. लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत झालेल्या भेटीत संजोग वाघेरे यांनी थेट अजित दादांना वाकून नमस्कार करत त्यांचे पाय धरले. नेमकं तेव्हा काय घडलं? ही भेट नक्की कुठे आणि कशी झाली, हे सर्वकाही आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात… ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळ चे महाविकास आघाडी चे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे शुक्रवारी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर आले होते. शुक्रवारी रात्री अजित पवार यांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी तिथे संजोग वाघेरे पाटील हेही होते. तेव्हा एकाच व्यासपीठावर एकत्र आलेल्या या नेत्यांमध्ये एक किस्सा पाहायला मिळाला. ( Maval Lok Sabha Shivsena UBT Candidate Sanjog Waghere Patil Meet With DCM Ajit Pawar In Wedding Ceremony )

संजोग वाघेरे पाटील हे पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच अजित पवार यांचे खंदे समर्थक होते. परंतू सध्या ते शिवसेना उबाठा पक्षात असून मावळ लोकसभेत मविआचे उमेदवार आहेत. त्यामुळे आपसूकच महायुती चे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात असल्याने आता अजित दादा हेही वाघेरे यांचे विरोधकच आहे. परंतू राजकीय संस्कृती दाखवत संजोग वाघेरे यांनी अजित पवार यांना पाहताच त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचे पाय शिवले.

अजित पवार हे या लग्न समारंभात आल्यावर ते व्यासपीठावरून वधूवरांना आशीर्वाद देत होते. तेव्हा थोड्यावेळात तिथे संजोग वाघेरे पाटील हेही आले. तेव्हा वाघेरेंनी अजितदादांना पाहिले आणि वेळ न दवडता त्यांना वाकून नमस्कार केला. अजित पवार यांनीही वाघेरेंचा नमस्कार हसून स्विकारला. परंतू त्या दोघांमध्ये कोणतेही संभाषण झाले नाही. हा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अधिक वाचा –
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग बसचा थरार – Video
– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याचे आवाहन । Pune News
– कै. सोपानराव ( आण्णा ) म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ आज वडगावात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा । Vadgaon Maval


Previous Post

कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद । Karla News

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, सुरक्षेच्या दृष्टीने ‘या’ तीन दिवसांत पॅराग्लायडींग, ड्रोन उडवण्यावर बंदी । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PM Narendra Modi will hold rally at pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, सुरक्षेच्या दृष्टीने 'या' तीन दिवसांत पॅराग्लायडींग, ड्रोन उडवण्यावर बंदी । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.