समाजमाध्यमांत आपल्या खळबळजनक वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या जमीन व्यवहारात फसवणूक, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर येत आहे. सन 2013 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान बेबडओहोळ (ता. मावळ) इथे हा व्यवहार सुरू होता. बुधवारी (दिनांक 17 मे) रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रवींद्र शिवाजीराव देशमुख (वय 48, रा. वडगाव बुद्रुक, ता. हवेली जि. पुणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (वय 33, रा. बेबडओहोळ, ता. मावळ) याना अटक करण्यात आली आहे. ( Maval Taluka BabaRaje Deshmukh Arrested In Fraud And Extortion Case )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबाराजे देशमुख यांनी त्यांची गट नंबर 196 बेबडओहोळ (ता. मावळ) याठिकाणी असणारी 5 एकर मिळकत वनीकरण विभागात समाविष्ट असल्याने त्या मिळकतीचे प्लॉटींग होत नाही, याबाबत माहिती असून सुद्धा त्या मिळकती मधील 25 गुंठे जागेचा फिर्यादीशी व्यवहार केला. त्याचा मोबदला म्हणुन 25 लाख रुपये रक्कम फिर्यादीकडुन घेतली. त्या जागेचे फिर्यादीचे नावाने खरेदीखत करुन न देता, तसेच फिर्यादीकडून घेतलेले 25 लाख रुपये फिर्यादीस परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. तसेच खरेदीखत करायचे असल्यास आणखी 70 लाख रुपयांच्या खंडणी मागितली. पैसे न दिल्यास अथवा पोलीसांकडे तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देवून, 5 लाख रुपये रक्कम खंडणी म्हणून घेतली आहे, असे फिर्यादीत नमुद आहे. शिरगाव पोलीसचे पोलिस उपनिरिक्षक कांबळे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– धक्कादायक! पवनानगर येथील महावितरण कर्मचाऱ्याचा धामणदरा इथे काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू
– अपघात ब्रेकिंग! उर्से टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, मुलीचा जागीच मृत्यू