राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान प्रभू श्रीराम यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केलीत. त्यांच्या विधानानंतर देशभर गदारोळ झालाय. आव्हाडांनी हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाने संपूर्ण राज्यभर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन सुरु केलीत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने देखील आज, शुक्रवार (दि. 5 डिसेंबर) पंचायत समिती कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यात आला. भाजपा पक्ष कार्यालय ते पंचायत समिती कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयासमोर आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच आव्हाडांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ( Maval Taluka BJP protest against NCP MLA Jitendra Awad )
ह्यावेळी भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी, प्रशांत ढोरे, प्रदेश युवा मोर्चा सदस्य राघूवीर शेलार, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, प्रवीण चव्हाण, संतोष कुंभार, सुधाकर ढोरे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, अनंता कुडे, विनायक भेगडे, सुभाष धामणकर, अभिमन्यू शिंदे, सचिन येवले, अविनाश गराडे, सुभाष देशमुख, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजित नाटक, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष ह.भ.प नंदकुमार शेटे, सुनील वरघडे, शिवांकुर खेर, अशोक ठुले, एकनाथ पोटफोडे, शरद साळुंखे यांच्यासह वडगाव शहरातील आणि तालुक्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– अवघ्या 7 दिवसात संजोग वाघेरेंनी जिंकला उद्धव ठाकरेंचा विश्वास! पक्षाकडून मावळ लोकसभेची मोठी जबाबदारी । Maval Lok Sabha
– गोरगरिबांना दिलासा! जन्म-मृत्यू नोंदीसाठीची फरफट थांबणार, आता तहसीलदारांना मिळालेत जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार
– वडगावमध्ये मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval