मावळ तालुक्यातील शिवली गावातील ज्ञानेश्वर झावरु येवले, मारुती येवले, भिवाजी रघु येवले, अक्षय हरिभाऊ येवले, सुजित ज्ञानेश्वर येवले यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. आमदार शेळकेंनी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार सुनिल शेळके, ॲड.नामदेवराव दाभाडे, बाळासाहेब आडकर, अरुण आडकर, पांडुरंग येवले, दिनकर आडकर आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
येणारं वर्ष हे लोकसभा, विधानसभा यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते हे मोर्चे बांधणी करताना आणि संघटना बांधणी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मागील दोन वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे ह्या सर्व निवडणूका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. अशात गावपातळीपासून पक्षाची मोट बांधण्यसाठी सर्वच पक्षातील नेते कामाला लागले आहेत. मावळ तालुक्यात सुनिल शेळके हे आमदार झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा पाहायला मिळतो आहे. ( Maval Taluka NCP Party Ajit Pawar Group MLA Sunil Shelke News Update )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी 2024 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा
– नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर येण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा
– बाळाभाऊ खासदार होणारच..! माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या वाढदिवसानिमित्त मावळ मतदारसंघात समर्थकांची जोरदार बॅनरबाजी