मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित निवडणूक सध्या चांगलीच रंगात आहे. एकूण 19 जागांसाठी होत असलेल्या या निवडणूकीत महायुतीने 10 जागा या बिनविरोध काढल्या आहेत. तर उर्वरित 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच अटीतटीची होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) अशी मिळून महायुती च्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय झालाय. अन् त्यातूनच निवडणुकीआधीच महायुतीच्या दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता 9 जागांसाठी 20 उमेदवार अशी लढत होणार आहे. ( Maval Taluka Sahakari Kharedi Vikri Sangh Election 2024 Updates Pune News )
एकूण 19 जागांपैकी अ वर्गातील 5 जागा बिनविरोध झाल्या. ब वर्गातील 2, महिला प्रतिनिधी 2 आणि भटक्या विमुक्त जाती गटातील 1 अशा एकूण 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) महायुतीच्या वतीने महायुती सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. तर काँग्रेसनेही क वर्ग, इतर मागास प्रवर्ग गटात उमेदवार दिले आहेत.
बिनविरोध विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
अ वर्ग –
तळेगाव : रुपेश घोजगे
साळुंब्रे : बाजीराव वाजे
लोणावळा : भरत येवले
कोथूर्णे : ज्ञानेश्वर निंबळे
आंबेगाव : शहाजी कडू
ब वर्ग – प्रमोद दळवी, आशा मारुती खांडभोर
महिला प्रतिनिधी – मनीषा आंबेकर, सुनीता केदारी
भटक्या विमुक्त जाती – शरद नखाते
निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :
अ वर्ग – टाकवे गट : शिवाजी असवले (महायुती), प्रकाश देशमुख, शांताराम लष्करी
अ वर्ग – शिवणे गट : धनंजय टिळे (महायुती), विष्णू घरदाळे
अ वर्ग – खडकाळे गट : संतोष कोंढरे (महायुती), रमेश भुरुक
अ वर्ग – वडगाव गट : निलेश म्हाळसकर (महायुती), एकनाथ येवले
क वर्ग – किरण हुलावळे, माणिक गाडे, गणेश विनोदे (तिघेही महायुती) आणि बबन आरडे, मारुती असवले, सदाशिव सातकर
इतर मागास प्रवर्ग : अमोल भोईरकर (महायुती), काळूराम थोरवे, खंडू तिकोणे
अनुसूचित जाती/जमाती : मधुकर जगताप (महायुती), नारायण चिमटे
अधिक वाचा –
– बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्कार प्रदान । Sansad Ratna Award
– संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती उत्साहात साजरी, तळेगाव दाभाडे शहरात भव्य मिरवणूक । Talegaon Dabhade
– मावळ तालुक्यातील पिंपरी गावात मध केंद्र योजनेचा जनजागृती मेळावा संपन्न; खादी व ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम । Maval News