Dainik Maval News : उद्या (शनिवार, दि.23 नोव्हेंबर) राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील मतदानाची मोजणी होणार आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणजे मावळ विधानसभा मतदारसंघ, इथे काय निकाल लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनिल शेळके आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यात अटीतटीची लढाई झाली. अत्यंत तुल्यबळ अशा लढतीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मावळवासियांचे डोळे लागून आहे. परंतु मतदारसंघात काही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाआधीच अभिनंदनाचे बॅनर झळकावले आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनिल शेळके यांचे बॅनर देहूतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ झळकले आहेत. “सगळा मावळ झटला पण आमचा सुनील आण्णा नाही हटला” अशा आशयाचा बॅनर शंकर काळोखे यांनी लावल्याने हे बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात 72 टक्के मतदान, महिला वर्गाचे विक्रमी मतदान : कोण बाजी मारणार ? । Maval Vidhan Sabha
– द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळात यंदा विक्रमी मतदान, मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय सांगतो? वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? । Maval Vidhan Sabha