व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापूसाहेब भेगडे विजयी झालेच तर ‘या’ पाच कारणांमुळे होणार, वाचा काय आहेत ते पाच मुद्दे । Maval Vidhan Sabha

मावळ विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार ? या प्रश्नाचे उत्तर अवघ्या काही तासात मिळणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 22, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Election vote counting Positive aspects of Bapus Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातून कोण विजयी होणार ? या प्रश्नाचे उत्तर अवघ्या काही तासात मिळणार आहे. परंतु जोवर मतमोजणी सुरु होत नाही, तोवर अंदाज आणि कौल यांचा पाऊस पडत आहे. अशात विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्या समोर तगडे आव्हान उभे केलेले बापूसाहेब भेगडे हे विजयी होणार असतील तर कोणत्या कारणामुळे ते विजयी होतील, हे माहिती असणे आवश्यक आहे. दैनिक मावळने घेतलेल्या आढाव्यात असे पाच प्रमुख मुद्दे आमच्या हाती आले आहेत, ज्यामुळे बापूसाहेब भेगडे हे विजयी होऊ शकतात.

क्रमांक 1 – शेळके विरोधकांची एकजुट
संपूर्ण निवडणुकीत बापूसाहेब भेगडे यांच्या बाजूचा सर्वात मोठा आणि आधाराचा मुद्दा जर कोणता राहिलाय, तर तो म्हणजे सुनिल शेळके यांच्या विरोधातील सर्व नेतेगण हे बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी उभे राहिलेत. महत्वाचे म्हणजे तालुक्याच्या राजकारणात नेहमी एकमेकांच्या विरोधात राहिलेले अनेक दिग्गज पुढारी बापूसाहेब भेगडेंसाठी एकत्र आले होते. ती ताकद बापू भेगडेंना मिळाली.

क्रमांक 2 – राष्ट्रवादीच्या जुण्या जाणत्या कार्यकर्त्यांची साथ
बापूसाहेब भेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुणे जाणते नेते. तालुक्याच्या राजकारणात गेली पंचवीस तीस वर्षे स्वतः बापूसाहेब भेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहेत. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे काम बापूसाहेब भेगडेंनी केले. पक्षाचे हे जुणे कार्यकर्ते बापूसाहेब भेगडेंच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र दिसून आले.

क्रमांक 3 – माजी मंत्र्यांची साथ, नेत्यांची फळी
मावळ विधानसभेची ही लढत रंगतदार होण्याचे कारण म्हणजे बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत आलेले तालुक्याचे माजी आमदार तथा माजी मंत्री. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री मदन बाफना आणि माजी आमदार कृष्णराव भेगडे तसेच निवडणुकांचा अनुभव असणारे चंद्रकांत सातकर या सर्वांची साथ बापूसाहेब भेगडेंना मिळाली ही त्यांची जमेची बाजू राहिली.

क्रमांक 4 – महाविकासआघाडीचा पाठींबा
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडीची ताकद दिसून आली होती. ही संपूर्ण ताकद यंदा विधानसभेला बापूसाहेब भेगडेंच्या पाठीशी होती. मविआतील तिन्ही घटकपक्षांनी आपला पाठींबा भेगडे यांना देत त्यांच्यासाठी काम केले होते.

क्रमांक 5 – जनतेचा चांगला प्रतिसाद
महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके हे ज्याप्रमाणे मतदारसंघात प्रचार करीत होते. त्याप्रमाणेच बापूसाहेब भेगडे हेही मतदारसंघात प्रचार करीत होते. साधारण वीस ते बावीस दिवस बापूसाहेब भेगडे यांनी मावळात प्रचार केला. या संपूर्ण प्रचार कालावधीत बापूसाहेब भेगडे यांना मतदार आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : निकाल ऐकायला तळेगावात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल, लगेच पाहा । Maval Vidhan Sabha
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, वाचा अधिक
– बापूआण्णा की सुनीलआण्णा, मावळात कुठल्या आण्णाचं पारडं ठरतंय जड ? पाहा काय आहे कौल । Maval Vidhan Sabha


Previous Post

…पण सुनिल आण्णा नाय हटला ! निकालाआधीच झळकले सुनिल शेळके यांचे बॅनर । Maval Vidhan Sabha

Next Post

मावळचा ‘नवा कारभारी’ ठरणार, भैरवनाथांचा आशीर्वाद कुणाला मिळणार? मावळ मतदारसंघात आज मतमोजणी, वाचा अधिक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Assembly Constituency

मावळचा 'नवा कारभारी' ठरणार, भैरवनाथांचा आशीर्वाद कुणाला मिळणार? मावळ मतदारसंघात आज मतमोजणी, वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.