वडगाव मावळ शहरात पीएमपी बसचे सवलतीचे पास सुविधा केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केली आहे. सध्या मावळ तालुक्यात ‘पीएमपी’ची बससेवा निगडी-वडगाव मावळ, निगडी-लोणावळा, निगडी ते टाकवे, निगडी ते नवलाख उंब्रे, निगडी ते उर्से, निगडी ते गहुंजे अशी चालू आहे. ( Mayor Mayur Dhore Demand To start PMP Bus Discount Pass Facility Center In Vadgaon Maval City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, पोलिस ठाणे, विविध शासकीय कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था आहेत. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण, येथील शासकीय कार्यालये उद्योग व्यवसाय, शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग व्यावसायिक, विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना कामासाठी ये-जा करावी लागते.
हेही वाचा – Video : वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून संविधान दिन उत्साहात साजरा, घटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन
अनेक कर्मचारी वडगावात राहत असून तालुक्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी इतर नागरिक बसने प्रवास करत आहेत. या सर्वांना सवलतीचा पास घेण्यासाठी निगडी येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय व आर्थिक नुकसान होते. सवलतीचे पास केंद्र हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वडगाव मावळ येथे सुरू केल्यास तालुक्यातील नागरिकांचा पाससाठी जाणारा वेळ व आर्थिक नुकसान टळेल आणि गैरसोय थांबेल. त्यामुळे हे पास केंद्र वडगावात लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्ष ढोरे यांनी ‘पीएमपी’च्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.
अधिक वाचा –
– स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकलीचा करूण अंत, काही दिवसांवर होता वाढदिवस; खंडाळा येथील दुर्दैवी घटना
– लोणावळा शहर भाजपाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम अभियान, वाचा काय आहे कारण?