तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि रावेत परिसरातील रामा पाटील या दोन टोळ्यांवर मोका (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम) नुसार कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
टोळीप्रमुख जय उर्फ कीटक प्रवीण भालेराव (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, तळेगाव दाभाडे), टोळीतील सदस्य ऋतिक उर्फ दाद्या पोपट मेटकरी (वय २२, रा. देहूरोड), विशाल शिवाजी गुंजाळ (वय १८, रा. तळेगाव दाभाडे), प्रदीप ज्ञानोबा वाघमारे (वय २२, रा. वडगाव मावळ), वैभव रामकृष्ण विटे (वय २५, रा. तळेगाव दाभाडे) आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि त्याच्या पाच साथीदारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, दुखापत, विनयभंग, खंडणी मागणे, बेकायदेशीर हत्यार तसेच अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, तोडफोड करणे असे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
टोळी प्रमुख रामा परशुराम पाटील (वय २९, रा. थेरगाव), टोळीतील सदस्य प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार (वय २२, रा. रहाटणी), नीरज रवींद्र आडाणे (वय २३, रा. मुदखेड, नांदेड) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ( Mcoca Act on Kitak Bhalerao and Rama Patil Gang action by pimpri chinchwad police in Talegaon Rawet Areas )
रावेत परिसरातील रामा पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांवर गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, कट रचणे, बेकायदेशीर जमाव जमवून सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे, चोरी करणे, चोरीचा माल घेणे असे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अधिक वाचा –
– तळेगाव येथील टी.जी.एच. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये 36 वर्षीय तरुणावर टोमोथेरपीद्वारे यशस्वी उपचार
– वडगावमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजनेचे अर्ज भरणे आणि E-KYC करण्याची सुविधा