Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे बांधकाम कामगार संघटना पुणे जिल्हा यांच्या वतीने ‘बांधकाम कामगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. आमदार सुनिल शेळके यांसह अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी आमदार शेळकेंनी कामगार महिला भगिनीं सोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मार्गदर्शन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘वाढत्या नागरिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्रात कामगार कार्यरत आहेत. बांधकाम कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांचे कल्याण वाढवण्यासाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली आहेत. अनेकदा सेफ्टी किट नसल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या अपघातांचा सामना करावा लागतो. कामगारांना सुरक्षा, आरोग्य व कामगार कल्याण मंडळांच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने कार्यरत रहावे.’ – आमदार सुनिल शेळके
या मेळाव्याला आमदार शेळके यांसह एकविरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, दिशा घरेलू महिला कामगार संघटना अध्यक्षा सिंधुताई तंतरपाळे, कमलताई जोगदंड आणि कामगार महिला-भगिनी उपस्थित होत्या. ( meeting of construction workers association concluded at Talegaon Dabhade MLA Sunil Shelke present )
अधिक वाचा –
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर
– बालेवाडी येथे महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ । Pune News
– मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड । Pune News