2022 ची वर्ष अखेर म्हणजेच थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षांचे स्वागत म्हणजेच 1 जानेवारी 2023, या दोन्ही इव्हेंटच्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल असोसिएशनची बैठक शुक्रवारी (23 डिसेंबर) घेण्यात आली. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे लोणावळा विभागाचे पोलिस अधिक्षक सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. ( Meeting of Hotel driver owner by Lonavala Rural Police on background of Thirty First and New Year )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी हॉटेल असोसिएशनच्या सर्व सदस्यांना पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय, धंदे चालणार नाहीत, याबाबत सूचना देऊन सर्व हॉटेल मॅनेजमेंट यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 149 प्रमाणे नोटीस देण्यात आल्या आहेत.
सदर बैठकीला सत्यसाई कार्तिक साहेब यांच्यासह लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस हवालदार नितेश कवडे, पो.ना. अंकुश पवार, पो.कॉ. सुभाष शिंदे, होमगार्ड निवृत्ती मराठे यांच्यासह हॉटेल असोसिएशनमधील हॉटेल मालक/चालक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– नाताळ, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पवना कॅम्पिंग चालक-मालक यांची बैठक, नियम पाळण्याची ताकीद
– यापुढे चुकीला माफी नाही; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हद्दीतील खासगी बंगला चालक-मालक यांना नियमांची तंबी