मावळ तालुक्यातील आदिवासी प्रकल्प घोडेगाव अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आणि ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत प्रलंबित विकास कामे करणे तसेच टाटा पॉवर क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना व स्मशानभुमीच्या जागे संदर्भात प्रलंबित कामाची महत्वपूर्ण बैठक मावळ पंचायत समिती सभागृह वडगांव येथे घेतली गेली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीसह गट विकास अधिकारी सुधीर भागवत, आदिवासी विभाग घोडेगाव चे अधिकारी डी.बी गायकवाड, आरोग्य अधिकारी लोयरे, बांधकाम विभागाचे आर एस पाटील आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. ( Meeting Was Held At Maval Panchayat Samiti Office In Presence of MP Shrirang Barane For Various Issues Of Tribal Society )
तसेच, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, युवासेना उपजिल्हा अध्यक्ष दत्ता केदारी, युवा सेना अध्यक्ष विशाल हुलावळे आणि आदिवासी विभाग अध्यक्ष नागू ढोगे, विक्रम हेमाडे, आदिवासी भागतील सरपंच आणि शासकीय अधिकारी उपस्थित यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– उद्धव ठाकरेंना झटका! दिग्गज नेत्याने साथ सोडली, एकनाथ शिंदेंजवळ असलेला भगवा घेतला खांद्यावर
– अपघात ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात, चालक जागीच ठार