मावळ तालुक्यातील शिळींब गावात मागील वर्षभरापासून हॅन्ड इन हॅन्ड इंडिया सामाजिक संस्था यांच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. गावातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. महिला बचत गटांना व्यवसाय सुरु करण्यासाठी यंत्र मिळवून दिली जात आहेत, किंवा अर्थ सहाय्य केले जात आहे. गावात सुरु असलेल्या या कामांची पाहणी करण्यासाठी संस्थेला आर्थिक सहाय्य करणारे रुस्तन पांडे आणि स्वीडन येथील मिकेल आणि जुलिएन हे मंगळवारी (दि. 27) शिळींब गावात आले होते. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात या परदेशी पाहुण्याचे स्वागत केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पवन मावळ विभागातील शिळींब ग्रामपंचायत येथे मागील दीड वर्षांपासून संस्थेचे विविध उपक्रम सुरु आहेत. गाव उत्थान कार्यक्रमाचा उद्देश हा एकात्मिक विकास घडवून आणणे, तसेच शाश्वत उत्पन्न आणि उपजीविकेसाठी समुदायामध्ये उद्योजगता वाढवणे असा आहे. ह्याअंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था, तळेगाव दाभाडे आणि रुस्तन पांडे यांसह मिकेला आणि जुलिएन हे शिळींब गावात आले होते. ( Mikael and Julien came to Maval From Sweden to See Industrial Activities Going on In Shilimb Village )
सदर प्रकल्पाअंतर्गत बचत गटांमार्फत सुरु करण्यात आलेल्या शेवई बनविणे, फिनाईल बनविने, केक बनविने, कास्य थाळी मसाज, शिलाई उद्योग, मातीची भांडी बनविणे अशा सर्वच ठिकाणी पाहुण्यांनी भेटी दिल्या आणि व्यवसायांची माहिती घेतली. यावेळी शिळींब ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक संतोष बोरडे, ग्रामपंचायत सदस्या अनिता शिंदे, गावातील विविध बचतगटातील महिला, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच संस्थेकडून आरती वारे, अनिल पिसाळ, ओंकार कुलकर्णी, अभिजित अब्दुले, सारिका शिंदे, कविता ढोकरे, शेखर खराडे, निर्मला शिंदे, रुपाली गोणते, कोमल लोखरे आणि पंढरीनाथ बालगुडे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मार्च महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर
– भाजपाचं ठरलंय… मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024