मावळ तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑगस्ट महिन्यात कोथुर्णे बला’त्कार प्रकरणाने हादरलेला मावळ तालुका आता पुन्हा एकदा अमानवीय घटनेने थरारला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
परप्रांतातून नोकरीसाठी लोणावळा येथे आलेल्या एका कुटुंबातील तेरा वर्षीय मुलीवर कुटुंबाच्याच नातेवाईकाने दारू पाजून लैंगिक अत्या’चार केल्याची संतपाजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
हेही वाचा – कोथुर्णेतील निर्भयाचा वाढदिवस; नराधम आरोपीला अजूनही फाशी नाहीच, राजकारण्यांची आश्वासने हवेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (4 ऑक्टोबर) रोजी रात्रीच्या सुमारास लोणावळा शहराजवळील वरसोली गावात हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी लोणावळा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार शंकर बहाद्दूर थापा या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या करत आहेत. ( Minor Girl Physically Abuse Accused Arrested By Lonavla Rural Police )
अधिक वाचा –
आख्ख्या महाराष्ट्राला ठाकरे-शिंदेंची चिंता, पण इकडे तर ठाकरे-शिंदे घरी लगीनघाई सुरु, विश्वास नसेल तर लग्नपत्रिका पाहा
शिवसेना भवनातून नवा आदेश..! शिवसेना मावळ तालुका प्रमुख पदी ‘यांची’ नियुक्ती, तर उपजिल्हाप्रमुख पदीही नवा चेहरा