Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहराचा ऐतिहासिक वारसा आणि वसा जतन करण्यासाठी सरसेनापती उमाबाई दाभाडे घराण्यातील वंशजांनी त्यांच्या मालकीची असलेली मंदिरे, यात पाचपांडव मंदिर, बनेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, राजघराण्याची समाधीस्थळे आदी ठिकाणी मंदीर बांधणी व सुधारणा करण्यासाठी संमती दिल्यास प्रत्येक मंदिरासाठी 1 कोटीचा निधी उपलब्द करून देईन, असे मत आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले.
हिंदवी स्वराज्याच्या प्रथम महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार यांच्या 271 व्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली वाहताना आमदार शेळके बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, श्रीमंत संध्याराजे दाभाडे, श्रीमंत वृशालीराजे दाभाडे, श्रीमंत दिव्यलेखाराजे दाभाडे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
सरसेनापती दाभाडे घराण्याने तळेगाव मध्ये जे योगदान दिले आहे त्याची जपवणूक करणे हि आपली जबाबदारी आहे, असे मत आमदार शेळके यांनी व्यक्त केले. यावेळी हभप माऊली दाभाडे यांनी इतिहासाचा आढावा व्यक्त केला. सूत्रसंचलन विनय दाभाडे यांनी केले. आभार तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती
– नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade
– स्तुत्य उपक्रम ! वडगाव मावळ शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट । Vadgaon Maval