व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करून मदत करणे व रस्ते दुरुस्तीचे प्रशासनाला आदेश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 13, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात अतिवृष्टी सदृश झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या. आंदर मावळ भागात देखील मुसळधार पावसाने शेती, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे निर्देश दिले.

नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी शेती वाहून गेली, भातशेतीचे मोठे नुकसान झाले, तर काही भागांत दरडी कोसळून रस्त्यांचीही दूरवस्था झाली आहे. भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यात यंदाचा पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केलेली लागवड आणि मशागतीचे कामे पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे.

आमदार सुनील शेळके यांनी आंदर मावळातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करत अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

कान्हे-वडेश्वर-सावळा रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी
कान्हे–वडेश्वर–सावळा या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची आमदार शेळके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हे काम दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावे, याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. पावसामुळे नागरिकांना कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा पूरप्रश्नी आढावा बैठक; नुकसानीचे पंचनामे, बाधितांना मदत, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत आमदार सुनील शेळकेंचे प्रशासनाला निर्देश

Next Post

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.