Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पाटण येथे झालेल्या भीषण दरड दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष तथा मावळ भाजपा नेते रविंद्र आप्पा भेगडे यांनी जाहीर केलेली आर्थिक मदत प्रत्यक्ष कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक बाधित कुटुंबाला तातडीच्या घरखर्चासाठी ५,००० रुपये इतकी आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. संकटाच्या या कठीण प्रसंगी केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे, तर मानसिक आधार देण्याचाही प्रयत्न मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी विजय तिकोणे, मावळ भाजपा कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, सचिन भेगडे आणि पाटण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
निसर्गाच्या या भीषण संकटामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा वेळी समाज म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. आर्थिक मदतीसोबतच त्यांना धीर देणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात साथ देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले.
मावळ प्रबोधिनीने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला असून, भविष्यातही समाजहिताची ही परंपरा कायम ठेवत संकटग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार मावळ प्रबोधिनी व रविंद्र आप्पा भेगडे यांनी व्यक्त केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
